नवरा पञकार आणि बायको वकिल लॉकडाऊनमध्ये हातभट्टी दारूची केली विक्री,दोघांना पोलिसांकडून मुद्देमाल सहित अटक
पुणे (वास्तव संघर्ष) हडपसर भागातील एका युट्युब चॅनेलचा पत्रकार आणि आणि त्याची वकील पत्नी अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी राहुल मच्छिंद्र हरपळे ( वय 33 ), सुचिता राहुल हरपळे ( वय 30, राहणार चंदवाडी, फुरसुंगी, हडपसर ) आणि राहुल याचे आई-वडील अश्या चौघांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याचे युट्युब चॅनेल आहे. तो स्वतः पत्रकार असल्याचे सांगतो. तर त्याची पत्नी वकील आहे. दरम्यान हरपळे यांनी हातभट्टी दारुचा साठाकरून ठेवला असून ती त्याची विक्री करत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार या महितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांच्याकडे हातभट्टी दारुचे कँड मिळून आले. त्यांच्याकडून 12 हजार 700 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिस कारवाई करण्यास गेल्यानंतर राहुल हा पोलिसांना मी पत्रकार आहे. तर सुचिता ही मी वकील आहे. तुमच्याबाबत वरिष्ठांना तक्रारकरून कारवाई करायला लावतो असे म्हणू धमकावल्याचे देखील या फिर्यादित म्हटले आहे. त्यावेळी पोलिसांनी त्या चौघांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच त्यांना अटक करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.