क्राईम बातम्याबातम्या

पिंपरी चिंचवड :लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचा धारधार शस्त्राने केला खून

File Photo

पिंपरी :- लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी या ठीकाणी सदरील घटना झाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सुमन चव्हाण (वय २२) असे मयत प्रेयसीचे नाव आहे. तर बरकत अली (वय २०) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुमन आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते दोघे एकत्र एका कंपनीत कामाला होते शनिवारी सकाळी प्रेयसी सुमन आणि प्रियकर बरकत हे काम करत असलेल्या कंपनीत आले. सर्व कामगार नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले. तेव्हा बरकत आणि सुमन हे दोघेच कंपनीत होते. सुमन नुकतीच मूळ गाव उत्तर प्रदेश येथून आली होती. तिच्या लग्नाचा विषय गावी सुरू होता. याची कुणकुण बरकतला लागली. त्यामुळे एकांतात असलेल्या प्रेयसीला बरकतने आपण लग्न करूयात असे म्हटले . त्यावर सुमन हिने लग्नास नकार दिला. नकाराने चिडलेल्या बरकतने सुमनच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

खून केल्यानंतर रागात असलेल्या बरकत घाबरला व पळून गेला. मात्र भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पुणे रेल्वे स्थानकात येथे पोहोचले. सर्व ठिकाणी आरोपी बरकतचा पोलिसांनी शोध सुरू केला. तेव्हा, पोलीस निरीक्षक गाढवे, पोलीस कर्मचारी विधाते, भोसले यांनी आरोपी गोरखपूर रेल्वेत बसणार तेवढ्यात त्याला ताब्यात घेण्यात आले.

Share this: