क्राईम बातम्याबातम्या

संपत्तीच्या वादातून मुलानेच वडिलांवर केला चाकूहल्ला;खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

खडकी (वास्तव संघर्ष) – संपत्तीच्या वादातून मुलानेच वडिलांवर चाकूहल्ला करुन जखमी केले . त्यानंतर सुनेने सासूला दांडक्याने मारहाण करून जखमी केले . ही घटना शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास खडकीतील गवळीवाडी जुनी तालीमशेजारी घडली .

याप्रकरणी पुरणचंद आहेर ( वय ६८ , रा.खडकी ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

कपिल पुरणचंद आहेर ( वय ३६ ) आणि निशा कपिल आहेर( वय ३० ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आहेर कुटुंबीय खडकीतील गवळीवाडी जुनी तालिम परिसरात राहायला आहेत . काही महिन्यांपासून मुलगा कपिल आणि वडिल पुरणचंद यांच्यात संपत्तीवरून वाद आहेत .

आहेर यांच्या राहत्या घराशेजारी कडबाकुट्टी कापणी मशीन असून त्याठिकाणी पुरणचंद यांना गाईचा गोठा करायचा होता . त्यासाठी त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे कापणी मशीन काढण्यासाठी अर्ज केला होता . त्याची माहिती कपिलला मिळाल्यामुळे त्याने वडिलांवर चाकूहल्ला करून जखमी केले . त्याशिवाय निशा यांनी पुरणचंद यांच्या पत्नीला दांडक्याने मारहाण करून जखमी केले .अधिक तपास खडकी पोलीस करीत आहेत.

Share this: