पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने रॉकेल ओतुन संपवले आपले जीवन
पिंपरी (वास्तव संघर्ष) : तुझ्या आई वडीलांच्या जमिनीत आपला हिस्सा लाव असे बोलुन वारंवार शिवीगाळ व हाताने मारहाण करुन पत्नीचा मानसिक व शारीरीक छळ केल्याने पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने रॉकेल ओतुन घेवुन स्वतःला पेटवून घेतले. ही घटना १८जुलै रोजी दुपारी ०४.०० वा चे सुमारास शिवाजीवाडी मोशी ता हवेली जि पुणे येथे राहते घरी घडली.
जालिंदर नारायण बोराटे (वय ६० वर्षे रा.शिवाजीवाडी मोशी ता हवेली जि पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत संजय मल्हारी भुजबळ , (वय ४६ वर्षे रा.तांबोळ ओढा दराके वस्ती तळेगाव ढमढेरे ता.शिरुर) मयत स्ञिचा भाऊ याने मोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण हीस तिचा पती आरोपी हा तिच्यावर चारीत्र्यावरुन संशय घेवुन तुझ्या आई वडीलांकडुन पैसे घेवुन ये तुझ्या आई वडीलांच्या जमिनीत आपला हिस्सा लाव असे बोलुन वारंवार शिवीगाळ व हाताने मारहाण करुन तिचा मानसिक व शारीरीक छळ केल्याने फिर्यादी यांची बहिण हिने पतीच्या त्रासाला कंटाळुन रॉकेल ओतुन घेवुन पेटवून घेतले आहे व उपचारादरम्यान ती मयत झाली. अधिक तपास मोशी पोलीस करीत आहेत.