क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सामाजिक काम करतो म्हणून तरूणावर जीवघेणा हल्ला ;दोन आरोपींना अटक तीन फरार

वाकड (वास्तव संघर्ष) : सामाजिक कामाचा राग मनात धरून टोळक्याने एका तरुणावर कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी(दि. 21) रात्री साडेदहाच्या सुमारास जय भवानी चौक काळेवाडी येथे घडली आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय शिवाजी सोंडकर( वय-28 रा . ए /13 , सुयोग कॉलनी , रहाटणी काळेवाडी लिंक रोड वाकड) असे जखमी आणि फिर्याद दिलेल्या तरूणांचे नाव आहे..

प्रमोद दयानंद कांबळे (वय-19 वर्ष रा .1 बी /1सुयोग कॉलनी , नखाते वस्ती , रहाटणी , वाकड) ओंकार बाळु बोरेकर (वय-21वर्ष रा . आझाद कॉलनी , जय भवनी चौक , वाकड) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. महेश माने, राहुल मोरे, रोहित शिंदे हे आरोपी फरार असून त्याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी अक्षय सोंडकर हे त्यांचे मावस भाऊ सागर कास्बीटे असे दोघे घरी जात होते. फिर्यादी अक्षय सोंडकर यांनी या परिसरात अनेक सामाजिक उपक्रम करत आहेत . या समाज कार्याचा राग मनात धरुन आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी अक्षय व त्यांचा मावस भाऊ सागर यांना शिवीगाळ करून कोयता , लाकडी दांडक्याने आणि हाताने मारहाण करुन गंभीर जखमी केले .अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Share this: