बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी अ‍ॅड. सोनाली घाडगे यांची नियुक्ती

पिंपरी (वास्तव संघर्ष)राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी अ‍ॅड. सोनाली घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल चे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड.आशिष देशमुख यांनी त्यांची नियुक्ती केली आहे . तसेच त्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लीगल सेल महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड.सुहास पडवळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी लीगल सेल चे पदाधिकारी अ‍ॅड.प्रसन्न लोखंडे , अ‍ॅड.विद्या शिंदे, अ‍ॅड.भूषण चिंचवडे, अ‍ॅड.राकेश गुरव, अ‍ॅड. गिरीश शिरसट, अ‍ॅड.रामचंद्र बोराटे, अ‍ॅड. दिलीप शिंगोटे उपस्थित होते.

दरम्यान, अ‍ॅड. सोनाली घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लीगल सेल बळकट करण्याचे व महिलांना सक्षमीकरण कसे करता येईल याबाबत माहिती दिली.

Share this: