क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक: पोलींसासमोरच तरुणीला जमिनीत जिवंत गाडलं

पुणे(वास्तव संघर्ष):पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न,शिवीगाळ धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधीत तरुणीने आणि तिच्या आईने केला होता. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या सहाय्याने अंगावर माती टाकून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिनी आणि तिच्या घरच्यांनी केला आहे. 

तरुणीने केलेल्या आरोपानुसार, नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तरुणी कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचं दिसतंय. तरुणीने घडलेल्या घटनेबाबत वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर राजगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसंच, या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन उपअध्यक्ष पुणे जिल्हा दिपक कांबळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे     गृहमंत्री यांच्याकडे केली आहे या निवेदनात ते म्हणतात,

पीडितेच बोलणं आहे की वेल्हे पोलीस ठाण्यातील API नितीन खामगळ यांच्या समोर यांच्या हद्दीत 22 वर्षीय तरुणीला  25 ते 30 जणांनी JCB सहाय्याने जमिनीत खड्डा खणून तरुणावर माती टाकली  तरुणीला जमिनीत  जिवंत गाडलं जीवे ठार मारण्याचा प्रयत्न  करूनही आरोपी व्हिडिओ मध्ये हसत आहे याला अटक नाही  

तरुणीला जमिनीत जिवंत गाडून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी व्हिडिओ मध्ये हसत आहे याला अटक नाही  JCB जप्त नाही यांना तात्काळ अटक करावी व IPC ,CRPC ,पोलीस अधिनियम 1951 नुसार कलम वाढ करत या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या पीडित ताईला पोलीस संरक्षण देण्यात यावे या केस चा तपास मा.भाऊसाहेब ढोले  उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग ,  मा. सत्य साई कार्तिक (भा.पो.से) सहायक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग व अतिरिक्त कारभार हवेली विभाग  यांनी करावा हे या अधिकारी यांची ड्युटी आहे.

Share this: