बातम्यामहाराष्ट्र

जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या: कालीचरण महाराजचे वादग्रस्त विधान

नाशिक (वास्तव संघर्ष ): कालीचरण महाराज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा ते त्याच्या वादग्रस्त विधानाने अडचणीतही आले आहे. आता पुन्हा एकदा कालीचरण महाराज यांनी जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या.असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कालीचरण महाराज  यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात बोलतानाच कालीचरण महाराज यांनी जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या. सर्व भोगून घ्या.चांगल्या फुलांचा वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कालिचरण महाराज यांनी केलं आहे.

कालिचरण महाराज म्हणाले की, अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे? ईश्वराबाबतही धर्माच्या अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपण देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. कोट्यवधीवेळा संभोग केल्यावर जो आनंद मिळतो, अगदी तसाच किंवा त्यापेक्षा जास्त आनंद अध्यात्मापासून मिळतो.

दरम्यान, जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या…सर्व भोगून घ्या…चांगल्या फुलांचा वास घ्या या कालीचरण महाराज यांच्या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच अनेकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे

Share this: