महाराष्ट्र

तर बारामतीत जाऊन नगरपालिका हमखास ताब्यात घेईन-गिरीष महाजन 

वास्तव संघर्ष – पक्षाने जबाबदारी दिल्यास शरद पवारांची बारामतीदेखील जिंकवून दाखवू, असे विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. महाजन यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी समाचार घेतला होता .

त्यांनी भाजपचे नेते आणि राज्यांचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यावर पलटवार करत म्हणाले ‘ये बारामतीमध्ये बघतोच तुला ५०- ५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय, अशा शब्दात अजित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता.

अजित पवार यांनी हे आव्हान दिल्यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की, पक्षाने मला आदेश दिला तर बारामतीत जाऊन नगरपालिका हमखास ताब्यात घेईन. १०० टक्के दाखवण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नाही. त्यामुळे बारामती जिंकणे अवघड नाही असे म्हणत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले आहे.

Share this: