बातम्यामहाराष्ट्र

अखेर अण्णा हजारे याचं ठरलं येत्या जानेवारीत करणार उपोषण

अहमदनगर (वास्तव संघर्ष) : शेतक – यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता भाजपचे नेते भेटीसाठी येत असले तरी आपण उपोषणावर ठाम आहोत . गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारशी संघर्ष सुरू आहे . एकदा दिल्लीत तर एकदा राळेगण सिद्धीत उपोषण केल्यानंतरही केंद्र सरकारने दिलेली दोन्ही लेखी आश्वासने पाळली नाहीत .असा आरोप करीत समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

एका खासगी वृत्तसंस्थेशी ते बोलत होते यावेळी अण्णा हजारे म्हणाले, आपण आता उपोषणावर ठाम असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण आंदोलनासाठी रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे . त्या प्रक्रियेला वेळ लागणारच आहे . तोपर्यंत एक महिनाभर केंद्र सरकार काय भुमिका घेते याची आपण वाट पाहू . नाहीतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे उपोषण सुरू करण्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला .

पंजाब व हरियाणातील शेतक – यांना पाठिंबा देण्यासाठी आपण एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करून पाठिंबा दिला होता . त्यावेळी आपण सांगीतले होते की , देश पेटून उठल्याशिवाय केंद्र सरकारला जाग येणार नाही . ज्या वेळी अन्याय अत्याचार होतो त्यावेळी कार्यकर्ता व प्रत्येक व्यक्तीने पेटून उठले पाहिजे . सर्व काही अण्णा हजारे यांनीच करावे ही भुमिका सोडून दिली पाहिजे . राज्यसभेचे खासदार डॉ . भागवत कराड यांनी मला सांगितले की , तुमचे वय आता ८३ वर्षे झाल्याने या वयात उपोषण तुम्हाला झेपणार नाही . मात्र मी त्यांना सांगितले की समाज व राष्ट्रहितासाठी व्रत घेतले आहे . वैद्यक शास्राप्रमाणे ८३ व्या वर्षी उपोषण झेपत नसले तरी ह्रदयविकार येऊन मरण्यापेक्षा समाज व राष्ट्रहितासाठी मरण आले तर काय वाईट आहे . असे असताना देखील अण्णा हजारे म्हणाले .

Share this: