बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिखलीतील ‘त्या’ भागात ट्राफिक पोलीसच नाहीत

चिखली (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमधील कृष्णानगर पोलीस लाईन भाजी मंडई चौक चिखली-आकुर्डी रोड येथे ट्राफिक पोलीस नेमण्यात यावे अशी मागणी स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड निमंत्रक विजय जरे यांनी तळवडे वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.

जरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कृष्णानगर पोलीस लाईन भाजी मंडई चौक चिखली-आकुर्डी रोड या ठिकाणी रहवाशी अति जास्त असल्यामुळे मुख्य रस्ता चिखली-आकुर्डी रोड हा एकच असल्या मुळे वारंवार कृष्णनगर पोलीस लाईन भाजी मंडई चौक येथे वाहतूक कोंडी होते .त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडी समोरे जावे लागते आहे. सदरील वाहतूक कोंडी थांबण्याकरिता चौकामध्ये ट्राफिक पोलीस असणे गरजेचे आहे.

परंतु गेल्या अनेक वर्षा पासून या ठिकाणी एकही ट्राफिक पोलिस नसतो. तसेच चौकामध्ये सिग्नल देखील आहे तो सुरळीत चालू असताना देखील ट्राफिक पोलीस नसल्या कारणामुळे नागरिक सिग्नल नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच पादचारी वय वृद्ध तसेच महिला शाळेय विदयार्थी यांना चौक उलाडून जा ये करण्या करिता तारे वरची कसरत करावी लागत आहे. त्या सर्व गोष्टीचा आपण स्वतः जातीने हजर् राहून पाहिनी करून योग्य निर्णय घेऊन चौका मध्ये कायम स्वरूपी ट्राफिक पोलीस नेमणात यावा. जेणे करून चौकामध्ये कोणत्या ही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही. व नागरिकांना वाहतुकीची शिस्त लागेल. तसेच अपघाताचे प्रमाण नियंत्रणात येईल व परिसरातील सर्व नागरिकांना वाहतूक कोंडी पासून सुटका होईल. असे निवेदनात म्हटले आहे.

Share this: