क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सोन्या तापकीर खून प्रकरणातील आरोपींना अटक 

पिंपरी(वास्तव संघर्ष) : शहरातील चिखली परिसरातील सोन्या तापकीर याचा 22 मे रोजी भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. हा खून मृताचा मित्र सोन्या पानसरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केल्याचे पोलिसतपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहोता. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेरीस या दोघांना सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या पैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ ऊर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे, वय – 23 वर्षे, रा.शिव ॲक्वा प्लॅटचे समोर, फलकेवस्ती, मोईगांव, ता. खेड, जि. पुणे. मूळ गांव- कासारमळा, पानसरेवाडी (सुपा)ता. बारामती, जि. पुणे असे असून त्याचा साथीदार अल्पवयीन आहे.

 पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट 1 च्या पथकाने ही कामगिरी केली आहे. गुन्हे शाखेची दोन पथके त्यांचा शोध घेत होती. चिखली, पुनावळे, मोईगांव, यवत, ता. दौंड, सुपा या भागात आरोपींचा शोध चालू होता. तपास सुरू असताना पोलिसांना आरोपी सरताळा, ता. जावळी, जि. सातारा येथे असल्याचे समजले. पोलीसपथक तेथे गेले. आरोपींचा शोध सुरू असताना सुरताळा येथे कालव्यालगत असलेल्या राज इंडियन व्हेज व्हेज हॉटेलच्याजवळ आरोपी के. टी. एम. मोटारसायकलवरून येताना दिसले. त्यांना पोलीसपथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. गुन्हयात वापरलेली दुचाकी व साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई  निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक इम्रान शेख,  अमंलदार बाळासाहेब कोकाटे, मनोजकुमार कमले, महादेव जावळे,सोमनाथ बोऱ्हाडे, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, अजित रूपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, नागेश माळी यांनी केली आहे.

Share this: