कुख्यात गुंड छोटा राजन व बाबा बोडके यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांस पोलीसांनी केली अटक
कामशेत (प्रतिनिधी) कामशेत येथे वृध्दआश्रम चालविणाऱ्या व्यक्तीस छोटा राजन व बाबा बोडके यांच्या नावाने खंडणी तसेच अपहरणाची धमकी देणाऱ्यास पोलीसांनी अटक केली असुन, त्याच्यावर गुन्हा दाखल कयरण्यात आला आहे.
याप्रकरणी विकी पोपट गायकवाड ( २९, रा, जांभूळ ता. मावळ ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, अकील गुलाबअली सोमाजी ( ५९, रा, कन्हैया क्लासिक अपार्टमेंट, बोट क्लब रोड पुणे ) यांनी कामशेत पोलिसांत फिर्याद दिली आहे,
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अकिल सोमाजी हे कामशेत नजीक वृध्दाश्रम चालवितात अकिल यांना जुन महीन्यात विकी गायकवाड याने आपण छोटा राजन तसेच बाबा बोडके यांच्या संपर्कातील व्यक्ती असून आपल्याला वृध्दाश्रमात सेक्युरिटीचे काम द्यावे काम न दिल्यास दर महिन्याला २५ हजार रूपये खंडणी द्यावी लागेल असे धमकाविले परंतु अकिल सोमाजी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने विकी गायकवाड याने अकिल सोमाजी यांना गुरूवारी ( दि, ९ ) त्यांच्या मोबाईलवर व्हॉटस्अॅप मेसेज पाठवून छोटा राजन तसेच बाबा बोडकेचे नावाने अपहरण करण्याची धमकी दिली.
यासंदर्भात अकिल गुलाबअली सोमाजी यानी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलिस निरिक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उप निरिक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, हवालदार दतात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, गणेश महाडीक, या पथकाने आरोपी विक्की गायकवाड याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी विक्की याला कामशेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.