पुण्यातील दीनानाथ मंगेशकर आणि आदित्य बिर्ला हास्पिटलसह धर्मादाय आयुक्तांचा 56 रुग्णालयांना दणका
दिपक साबळे..! पिंपरी ( वास्तव संघर्ष ) – राज्य शासनाकडून नाममात्र दराने जमिनी भाडे कराराने घेवून त्यावर पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात 56 खासगी हाॅस्पीटल उभारली आहेत. सर्व सामान्यांना रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी हॉस्पिटलच्या नावापुढे आता ‘धर्मादाय’ हा शब्द लावणे बंधनकारक केले आहे. हे बदल त्वरित अंमलात आणावेत, असे आदेश धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी खासगी हॉस्पिटलना दिले आहेत. त्यामुळे शहरातील ५6 खासगी हॉस्पिटलच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावण्यात येणार आहे.
पुण्यात दीनानाथ मंगेशकर, रुबी, जहांगीर, पूना, नोबेल, सह्याद्री, संचेती या बड्या हॉस्पिटलसह सुमारे ५६ खासगी हॉस्पिटलचा कारभार धर्मादाय आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतो. सध्या खासगी हॉस्पिटलपैकी काही हॉस्पिटलना सरकारकडून विविध सवलती दिल्या जातात. त्या बदल्यात गरिबांवरील उपचार खर्चात सवलत देण्याचे आदेश यापूर्वीच हायकोर्टाने दिले आहेत.
‘सध्या शहरातील खासगी हॉस्पिटलच्या नावामध्ये धर्मादाय या शब्दाचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे सामान्य अथवा गरीब पेशंटना ही धर्मादाय अथवा खासगी हॉस्पिटल आहेत, हे लक्षात येत नाही. त्यासाठी हॉस्पिटलच्या नावापुढे धर्मादाय हा शब्दप्रयोग करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे गरीब पेशंटना हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणे शक्य होईल. या आदेशाची अमंलबजावणी नऱ्हे येथील काशीबाई नवले हॉस्पिटलने केली आहे. या संदर्भात हॉस्पिटल असोसिएशनची बैठक घेऊन त्यांना माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या नावापुढे धर्मादाय या शब्दाचा उल्लेख करण्याचे ठरवले आहे.
(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवडसह मावळातील ही आहेत धर्मादाय रुग्णालये…
थेरगांवचे आदित्य बिर्ला हाॅस्पीटल, पिंपरीचे डाॅ. डी.वाय.पाटील हाॅस्पीटल अॅन्ड रिर्सच सेंटर, चिंचवडचे मोरया मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल, निगडी व चिंचवडचे लोकमान्य हाॅस्पीटल, निगडीचे आयुर्वेद रुग्णालय व स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल, मोशीचे संत ज्ञानेश्वर हाॅस्पीटल, वडगावचे सिंहगड डेंटल काॅलेज अॅन्ड हाॅस्पीटल, आळंदीचे इंद्रायणी हाॅस्पीटल अॅन्ड कॅन्सर सेंटर, तळेगावचे सेवाधाम हाॅस्पीटल, तळेगाव जनरल हाॅस्पीटल, डाॅ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल हाॅस्पीटल,
राज्यातील सुमारे ४३० धर्मादाय हॉस्पिटलना हा आदेश लागू आहे. वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपयांच्या आत असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी दहा टक्के म्हणजेच पाच हजार तर, वार्षिक उत्पन्न ८५ हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या गरीब निर्धन नागरिकांसाठी आणखी पाच हजार खाटा राखीव आहेत. अशा आर्थिक दुर्बल घटकाच्या पेशंटना उपचारांमध्ये ५० टक्के तसेच गरिबांना मोफत उपचार देण्याची तरतूद हायकोर्टाने केली आहे. सांगली, सिंधुदुर्ग आणि भंडारा या जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलने नावापुढे धर्मादाय हा शब्द लावला आहे.
शिवकुमार डिगे, आयुक्त, धर्मादाय आयुक्तालय
पुणे जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयाची यादी