क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बाळाजीनगर सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या टाकीत सापडला मानवी हाडांचा सांगाडा

भोसरी(वास्तव संघर्ष ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बालाजीनगर भोसरी येथे सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या टाकीत मानवी हाडांचा सांगाडा आढळला. हा प्रकार आज (मंगळवारी, दि. 17) सकाळी उघडकीस आला आहे. शौचालयाच्या टाकीची स्वच्छता सुरू असताना आज सकाळी टाकीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला.

याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून सांगाड्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान खून करून मृतदेह टाकीत टाकला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र सांगाडा आढळलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याने पोलीस या सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत

Share this: