क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

तिघांनी मिळून एका अल्पवयीन मुलाला लोखंडी कड्याने मारून जखमी केले ;सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगवी (वास्तव संघर्ष) – रागाने बघितल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका 16 वर्षीय मुलाला लोखंडी कड्याने मारून जखमी केले . ही घटना सोमवारी ( दि . 16 ) दुपारी सव्वा पाच वाजता शिवनेरी चौक , नवी सांगवी येथे घडली .

संकेत संजय मोहिते ( वय 16 , रा . कवडेनगर , नवी सांगवी ) असे जखमी मुलाचे नाव आहे . त्यांनी याबाबत मंगळवारी ( दि . 17 ) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

रिद्धेश पाटील ( वय 18 ) , अश्विन चव्हाण ( दोघे रा . कवडेनगर , नवी सांगवी ) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी संकेत यांनी आरोपींकडे खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना हातातील लोखंडी कड्याने मारून जखमी केले . त्यानंतर ‘ अश्विन इथला भाई आहे , तुला माहित नाही का ‘ असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली .अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत .

Share this: