बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता काका साने यांनी मृत्यूपश्चात्य व्यक्त केली शरद पवार यांच्याप्रति कृतज्ञता

पिंपरी-चिंचवडमधील ‘रे क्रिएशन’ची अफलातून कलाकृती

नगरसेवक दत्ताकाका साने यांना ‘रे क्रिएशन’ने वाहिली अनोखी श्रद्धांजली

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा करोनामुळे नुकताच मृत्यू झाला. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्यांदा करोना विषाणूची सौम्य लक्षण होती. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप करताना त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. अखेरच्या श्वासापर्यंत कोरोना काळातही जनतेच्या सवेसाठी तत्पर राहिलेले दत्ता काका साने यांच्या निधनानंतर ७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पिंपरी-चिंचवड येथे साने यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली. आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

यानंतर दत्ता काका साने यांच्या मनातील शरद पवार यांच्या बद्दलच्या हृदयस्पर्शी कृतज्ञतापूर्वक भावना पिंपरी-चिंचवड येथील ‘रे क्रिएशन’ने व्हिडिओद्वारे व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये मृत्यूपश्चात्य दत्ता काका साने यांच्या निष्ठेचे फळ मिळाल्याने साने यांची अखेरची इच्छा पूर्ण झाल्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रभर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून रे क्रिएशनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘रे क्रिएशनचे संचालक, अविनाश आदक (९३७०४ ९३९२२), किरण जोगदंड (९३०९७०४७४२) अर्थात ‘अविकिरण’ या प्रतिभावंत जोडीने साकारलेला हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहणार्‍याच्या डोळ्यात टचकन पाणी आणणारा आहे. किरण जोगदंड यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा व्हिडिओ अविनाश आदक यांनी शब्दबद्ध व आवाजबद्ध केला आहे. अदक यांच्या अमोघ वाणीतून व्यक्त झालेले दत्ता काका साने यांचे मृत्यूपश्चात मनोगत प्रत्येकाच्या हृदयाला हळवा स्पर्श करून जात आहे. सदर व्हिडिओमध्ये दत्ता काका साने शरद पवारांविषयी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त होताहेत की, साहेब तुमची शिकवण मनाशी बाळगून आयुष्यभर जनतेची सेवा केली. हा तुमचा दत्ता तुम्हाला एक शब्द देतो.

पुन्हा जेव्हा कधी जन्म घेईन, तेव्हा याच महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेईन. ज्या मातीत आजचा उत्तुंग महाराष्ट्र तुम्ही घडविलाय. छत्रपती शिवरायांचा पराक्रम, शाहू, फुले आंबेडकरांचा तेजस्वी पुरोगामी विचार पुन्हा नसानसात भिडविण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता म्हणूनच जन्म घेईन. राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ही वाक्य ऐकून राष्ट्रवादीचे महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते सध्या ‘रे क्रिएशन’ची स्तुती करत आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता व्हाट्स अपला स्टेटस ठेवत आहे. तर फेसबुकवर स्टोरी आणि शेअर करत आहेत.

Share this: