बातम्या

राष्ट्रवादी युवतींच्या ‘किल्ले बनवा स्पर्धा’ पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

पिंपरी (वास्तव संघर्ष) : राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस व सिद्धिविनायक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कु.वर्षा जगताप आयोजित प्रभाग क्र. 20 संत तुकाराम नगर या ठिकाणी किल्ले बनवा स्पर्धा 2021 पारितोषिक वितरण सोहळा पार पडला यामधे जवळपास 200 मुलांनी उस्फूर्त असा सहभाग घेतला होता. सहभागी प्रत्येक स्पर्धकास छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प त्या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आले. तसेच प्रथम क्रमांकास 3000 द्वितीय क्रमांक 2000 व तृतीय क्रमांकास 1000 व 3 उत्तेजनार्थ 500रुपयांचे असे रोख पारितोषिक याठिकाणी देण्यात आले.

प्रथम क्रमांक=शिवतेज मित्र मंडळ.वल्लभनगर .
द्वितीय क्रमांक =कोरोना योद्धा ग्रूप.सुखवाणी कॅम्पस
तृतीय क्रमांक=राजगड ग्रूप.अक्षय सोसायटी.
उत्तेजनार्थ=अष्टविनायक मित्र मंडळ.वल्लभनगर.
उत्तेजनार्थ=कोंढाणा ग्रूप. गंगानगर.
उत्तेजनार्थ=ईगल स्टार ग्रूप. वल्लभनगर. तसेच वैयक्तीक मधे प्रथम क्रमांक=आर्या विक्रांत वर्पे.
द्वितीय क्रमांक=दीपक खिलारे. या सर्व वरील स्पर्धकांनी नंबर पटकवला.

या कार्यक्रमच्या मुख्य आयोजक कु.वर्षा जगताप होत्या.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी महापौर तथा नगरसेवक योगेश बहल, मा. सभापती शिक्षण मंडळ फजल शेख,मा.उपसभापती शिक्षण मंडळ शेरबहादूर उर्फ मायला खत्री, विरेंद्र योगेश बहल ,डॉ.पौर्णिमा कोल्हे ( परीक्षक)तसेच महेश देशपांडे,योगेश खोल्लम,अमित काटे,राकेश गायकवाड,अशोक शिरसाठ,मंगेश येरुनकर,स्वप्निल डोळस,गोरोबा गुजर,हरप्रीत सिंग,राखी धर,अर्चना खोल्लम आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this: