क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

बायकोला उपाशीपोटी ठेवुन नवरा करायचा असंकाही ;कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का

निगडी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळींसह पतीने पत्नीला उपाशीपोटी ठेवुन शारिरीक व मानसिक छळ केला आहे. ही घटना पावतो इलिगस्ट रेसिडेन्सी इन्सपिरिया मॉल मागे आकुर्डी येथे घडली आहे.

याबाबत पिडीत विवाहीत महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती अभिजीत धनंजय चव्हाण (वय-31),सासरे धनंजय रामचंद्र चव्हाण (वय-65),सासु (वय-55, सर्व रा.  . इलिगस्ट रेसिडेन्सी तालेरा फोर्ड शोरुम जवळ इन्सपिरिया मॉल मागे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपले सासरी नांदत असताना फिर्यादी यांचे पती आरोपी  अभिजीत याने फिर्यादी महिलेला अनैसर्गिकरित्या संभोग करण्यास भाग पाडले. तसेच फिर्यादी महिलेला शिविगाळ करुन मारहाण करत  बाराव्या मजल्यावरुन फेकुन देईल अशी धमकी देवुन  फिर्यादीना माहेराहुन गाडी फ्लॅट , सोने खरेदी करीता पैसे आणणेकरीता त्यांचे सासु सासरे व पती यांनी छळ करुन फिर्यादी यांना उपाशीपोटी ठेवुन त्यांचा मानसिक व शारिरीक छळ केला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Share this: