बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मराठवाडा विकास संस्थेचे ईश्वर कांबळे यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश

पिंपरी(वास्तव संघर्ष) मराठवाडा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरात बैठक आयोजित करणेत आली होती. शहराध्यक्ष इंजिनियर देवेंद्र तायडे यांचे नेतृत्वाखाली कांबळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

या बैठकीत राज्याचे उपाध्यक्ष गोंविद दळवी , सर्वजित बनसोडे अनिल जाधव, सविता मुंडे, पश्चिम महाराष्ट्र समीक्षा बैठकीचे समन्वयक चंद्रकांत खंडईत, आतुलजी बहुले यांनी संबोधित केले. शहराध्यक्ष इंजि देवेंद्र तायडे ,महीला अध्यक्ष लताताई रोकडे व माजी नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्ष अंकुश कानडी, सुहास देशमुख ,महासचिव राजन नायर, संजीवन कांबळे, शहर प्रवक्ते के.डी.वाघमारे उपाध्यक्ष सन्नी गायकवाड, वंचित बहुजन आघाडी माजी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील, राजेंद्र साळवे आदीं मान्यवर उपस्थित होते.

आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 विषयक चर्चा करण्यात आली, लोकसभेत मिळालेली एकूण 43 लाख मते ही निष्ठावान मते असून येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक कसे निवडुन जातील याविषयी बैठकीमध्ये प्रकर्षाने चर्चा मार्गदर्शन झाले. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग ईश्वर कांबळे व त्यांचे शहरातील वेगवेगळ्या पक्ष संघटना समर्थक कार्यकर्ते सह आजमितीस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश करण्यात आला. यावेळी संदीप साळवे छगन गोरख खळगे, दीपक जावळे ,अतुल झोडगे, नितीन कोरबन ,सुरज कसबे, गौतम मकासरे ,आविराज कालेकर , व्यंकटेश कुराडे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

मराठवाडा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर कांबळे यांनी अनेक विधायक उपक्रम, नावीन्यपूर्ण अभियाने राबवली आहेत. महापालिका, राज्य, केंद्र शासनाच्या नागरी हिताच्या योजना लोकाभिमुख होण्यासाठी ईश्वर कांबळे विठ्ठलनगर नेहरूनगर येथे यंत्रणा उभारली.तसेच कोरोना काळात झोपडपट्टीतील गोरगरिबांना घरपोच अन्नदाधान्य पुरवठा त्यांनी केला. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने संस्था कार्यरत ठेवली.

Share this: