बनावट आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी एका तरुणांवर गुन्हा दाखल
हिंजवडी (वास्तव संघर्ष) : बनावट आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा प्रकार शुक्रवारी ( दि . 24 ) दुपारी हिंजवडी येथे घडला .
या प्रकरणी पोलीस नाईक जालिंदर गोरे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
अक्षय रवींद्र जाधव ( वय 24 , रा . साखरे वस्ती , हिंजवडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी अक्षय जाधव याचे ग्रामपंचायत बिल्डिंग हिंजवडी येथे कृष्णा फोटो स्टुडिओ नावाचे दुकान आहे . आरोपी अक्षय याने त्याच्या मोबाईल फोन मध्ये एका व्यक्तीच्या आधार कार्डचा फोटो काढला . त्या आधार कार्ड वरील आधार क्रमांक वापरून त्याने बनावट आधार कार्ड तयार केले . त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फोटो स्टुडिओ मधील संगणकातील सर्व माहिती डिलीट केली . याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत .