ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड
वास्तव संघर्ष.
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर हे काळाच्या पडद्याआड गेले आज त्यांचे निधन झालं. मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी यासारख्या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिका, तसंच माहेरची साडी, अष्टविनायक यासारख्या लोकप्रिय सिनेमात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. मराठीतील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. जून २०१८ मध्ये मराठी नाट्य संमेलनात अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
रमेश भाटकर यांचा अल्पपरिचय
रमेश भाटकर यांनी न१९७७ च्या चांदोबा चांदोब बागलास का या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं
यानंतर १९७८ अष्टविनायक , दुनिया करी सलाम, माहेरची माणसं, आपली माणसं, माहेरची साडी, लेक चालली सासरला या सिनेमात प्रमुख भूमिक साकारली
मराठी आणि हिंदी सिनेमांमध्येही काम
हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी या मालिका लोकप्रिय झाल्या
कमांडर, तिसरा डोळा या मालिकांमधून ते घराघरात पोहोचले
सरकारनामा, सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव, काय द्यायचे बोला, दुनिया करी सलाम, सोबती, वहिनीची माया, मी चेअरमन बोलतोय, प्रेम करुया खुल्लम खुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, मधु चंद्राची रात्र, हमाल दे धमाल, दे टाळी, लपवा छपवी, बॉम्बे वॉर, माहेरची साडी, बंधन, आपली माणसं, सवत माझी लाडकी, पैसा पैसा पैसा, घायल, बॉम्ब ब्लास्ट, बेदर्दी, सहमे हुए सितारे, बदमाश, हफ्ता वसुली, सेन्सर, जयदेव, मराठा बटालियन अशा अनेक सिनेमांमध्ये रमेश भाटकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आणि त्या गाजवल्या