बातम्या

अनाथांची माय पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे निधन

पुणे (वास्तव संघर्ष) : अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणा – या अनाथांची  माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त , ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ (वय- 74 वर्षे) यांचे मंगळवारी राञी 8 ;10 मिनिटांनी पुण्यातील गॅलस्की हॅास्पीटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

गॅलस्की हॅास्पीटलमध्ये सिंधूताईंना 25 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते त्या अनेक दिवसांपासून या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले.

सिंधूताई यांचे मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात अनेक अनाथ मुले राहत आहेत . त्यांच्या जाण्याने या अनाथ मुले पोरकी झाली आहेत . सिंधूताई या माई नावाने परिचित होत्या .सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी 2021 मध्ये सिंधूताई सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला. मध्यंतरी त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.  

Share this: