बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी विधानसभेत ‘राष्ट्रवादी’ ला धोक्याची घंटा

पिंपरी (वास्तव संघर्ष ): पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे  विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देंवेंद्र तायडे यांनी कंबर कसलेली दिसून येत आहे.

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर पक्षाअंतर्गत  काही कार्यकर्ते नाराज असल्यांने त्याचा फटका येणा-या विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसू शकतो.मात्र याउलट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देंवेंद्र तायडे यांनी आपली फिल्डिंग जोरदारपणे या मतदार संघात लावली आहे.परिणामी पक्ष असो किंवा अपक्ष असो इच्छुक उमेदवारांचे नाव देखील शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.त्यामुळे पिंपरी विधानसभेत दोन्ही राष्ट्रवादी ला धोक्याची घंटा असून नागरिक तिसराच पर्याय शोधण्याच्या मानसिकतेत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यास आता अवघे दीड महिने उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. यंदाची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती विरूद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी यांच्यातच रंगणार आहे. असे असले तरी मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि ठरले तर मराठा आंदोलनाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास यंदाची निवडणूक बहुरंगी होऊन प्रचंड गाजणार आहे. त्यात बंडखोरांचे पेव फुटल्यास यंदाची निवडणूक प्रत्येक मतदारसंघात अत्यंत घासून होऊ शकते. त्यामुळे आगामी निवडणुकीबाबत संपूर्ण महाराष्ट्रातच प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्येही विधानसभा निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.

काही दिवसापुर्वी पिंपरीमध्ये पावसामुळे नागरिंकांच्या घरात पाणी शिरले होते.जे पिंपरी मतदारसंघात ‘आमदार’ होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी साधे या नागरिकांकडे डुंकुंनही पाहीले नाही. काहींनी तर हद्दच पार केली होती त्यांनी  या नागरिकांच्या दुःख:चा ‘ईव्हेंट’करत सोशलमिडीयावर फोटोसेशन करत प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 

पिंपरी विधानसभेतील झोपडपट्यांमध्ये अस्वच्छता त्यामुळे वाढलेला डांसाचा प्रादुर्भाव रोगराई तसेच पिण्याच्या पाण्याची अस्वच्छता   या समस्येवर कोणी काम करताना दिसत नाही.या व अशा अनेक समस्यांने पिंपरी विधानसभेतील नागरिक त्रस्त झाले असून त्यांना बदल हवा आहे.पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे आणि झोपडपट्ट्यांमध्ये हा वर्ग जास्त रहात आहे. मात्र काचाच्या घरात राहणा-यांना या गोरगरिबांचे दुःख काय समजणार. ते फक्त स्वःताची राजकीय पोळी भाजताना सर्रास दिसत आहेत. 

या मतदारसंघातून लढण्यासाठी अनेक माजी नगरसेवक आणि अनेक हौसे, नवसे आणि गवसे देखील इच्छुक आहेत. त्यातील काहीजण बिल्डर आणि ठेकेदारांना हाताशी धरून राजकारणाचा धंदा करणारे, अन्य मतदारसंघात डिपॉझीट जप्त झालेले, वेळ आली तर शहर सोडून पळून जाणारे सुद्धा आहेत. या मतदारसंघातील इच्छुकांची यादी खूप मोठी आहे. त्यामुळे या मतदारसंघात हे सर्वचजण लढण्यासाठी उतरल्यास बहुरंगी लढत होणार आहे. या बहुरंगी लढतीत कोण कोणाची मते खाणार आणि त्याचा फायदा कोणाला होणार यावरच पिंपरी मतदारसंघातील विजयाचे गणित निश्चित होणार आहे.

Share this: