बातम्या

घरकुल योजनेच्या प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी शेवटची संधी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या से.क्र . 17 व 19 चिखली येथील जागेवर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासांठी घरकुल योजना राबविणेत येत असून यासाठी निवड झालेल्या प्रतीक्षा(वेटिंग) यादीतील लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरणेसाठी दि . 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देणेस आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली . हि अंतिम मुदतवाढ असून या मुदतीमध्ये स्वहिस्सा रक्कम न भरणा – या लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतून रद्द करण्यात येईल असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले .

स्थायी समिती सभेने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली होती . सदरच्या योजनेमध्ये दि . 23 ॲागस्ट 2011 रोजी झालेल्या संगणकीय सोडतीमधील प्रतिक्षा यादीमध्ये असलेल्या प्रवर्गानिहाय 456 लाभार्थीना घरकुल योजनेमध्ये स्वहिस्सा रक्कम भरणेकामी मान्यता देण्यात आलेली आहे . तरी संबंधित लाभार्थीनी प्रथम स्वहिस्सा र.रु .50,000 व उर्वरीत स्वहिस्सा र.रु. 3,2600 – असे एकूण र.रु .3,76000 भरणेकामी 31 जुलै 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती .

त्यामधील प्रथम स्वहिस्सा रक्कम भरणा करणा – या लाभार्थीना उर्वरीत स्वहिस्सा भरणेकामी व ज्या लाभार्थीनी प्रथम व उर्वरीत स्वहिस्सा रक्कम भरलेली नाही अशा लाभार्थीना स्वहिस्सा रक्कम भरणा करण्यासाठी दि . 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिलेली आहे . हि अंतिम मुदतवाढ असून यानंतर निवड झालेल्या या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्याhttps://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php संकेतस्थळावर तसेच झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग , चिंचवड येथे पाहण्यास उपलब्ध आहे .

Share this: