बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उन्हात बसून भाजीचा व्यवसाय करून दाखवावा; भाजी विक्रेत्यांची थट्टा पालिकेने थांबवावी – गणेशआहेर

भर दुपारी उन्हात भाजी विकताना भाजी विक्रेते

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत्या कोरोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने कोणतही नियोजन न करता भर उन्हात भाजी विक्रेत्यांना शहरातील अनेक मोकळ्या मैदानात जागा तात्पुरते स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. माञ भाजी विक्रेत्यांच्या आरोग्याचा कोणताही विचार न करता त्यांना भर उन्हात भाजी व्यवसाय करण्यास महापालिकेच्या आधिकार्यांनी परवानगी देवून भाग पाडले आहे.

ज्यांने करूण भाजी विक्रेत्यांने वैतागून व्यवसाय बंद करावा अशीच त्यांची वैचारीकता सध्यातरी दिसून येत आहे.एप्रिल महिना हा उन्हाळ्याचे खरी सूरूवात करणारा महिना असतो माञ महापालिकेने सकाळी ११ ते दूपारी ४ या वेळीत व्यवसाय करण्याचे परवानगी दिले आहे. पण भर उन्हात छञी देखील लावण्याचे परवानगी महापालिकेने दिली नसल्याचं भाजी विक्रेते सांगत आहेत.

त्यांची भाजी ह्या भरउन्हात पूर्णपणे खराब होईल ह्याचा देखील विचार महापालिकेने केला नसल्याचं दिसून येत आहे. जर अश्या पध्दतिचे नियोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आधिकारी करत असेल तर महापालिका अधिकार्यांनी एक तास उन्हात बसून भाजीचा व्यवसाय करून दाखवावा भाजी विक्रेत्यांची थट्टा पालिकेने थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेशआहेर यांनी या वेळी केले आहे.

गरीबाचा कोणताच विचार पिंपरी-चिंचवड महापालिका करत नसेल तर अशी दुटप्पी भूमिका देखील आधिकार्यांने घेवू नये. एकेकडे व्यवसायासाठी मोकळ्या मैदानात जागा उपलब्ध करुन द्यायचे दूसरीकडे त्यांना छञी देखील लावू न देण्याचे भूमिका घेणं कितपक योग्य असा प्रश्न देखील गणेश आहेर यांनी उपस्थित केला आहे.

Share this: