बातम्या

भाऊ गृहमंत्री असताना राजाराम पाटील यांनी कधीच भांडवल केलं नाही :अजित पवार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. आबा यांचे बंधू राजाराम पाटील यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातून कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राजाराम पाटलांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला .ते म्हणाले महाराष्ट्रात सर्वाधिक काळ गृहमंत्री म्हणून आबाने काम पाहिले, गृहमंत्री असताना त्यांनी कधीच कुणाला झुंकत माप दिले नाही, मला आताच कळलं की त्यांचे बंधू पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस उपायुक्त आहेत त्यांचा भाऊ गृहमंत्री असूनही राजाराम पाटील यांनी त्याचं कधीच भांडवल केलं नाही. नाही तर काही जणांचा लांबचा पाहुणा गृहमंत्री असला, तरी तो पोलिस आयुक्तालय चालवतो, मात्र राजाराम पाटील यांनी कधीच याचा गैरफायदा घेतला नाही” अशा शब्दात अजित पवारांनी राजाराम पाटील यांचे कौतुक केले.

सहाय्यक पोलिस आयुक्तपदी सेवा बजावताना राजाराम पाटील यांना 15 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले होते. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पदक, पोलिस शौर्य पदक, उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक जाहीर करण्यात येतात. राजाराम रामराव पाटील जवळपास दोन वर्षांपासून सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत होते.

या कार्यक्रमात आमदार आण्णा बनसोडे , खेडचे आमदार दिलीप मोहिते , पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर , अतिरिक्त आयुक्त अजित पवार , पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदी उपस्थित होते .

Share this: