इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी भर रस्त्यावरच पेटवली चूल
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारने आज पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये उच्चांक गाठला आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी हि भाववाढ करताना कष्टकरी व कामगार महिलांचा विचार केला नाही. ‘उज्वला गॅस’ योजनेतून एक कोटी गॅस कनेक्शन देण्याची फसवी घोषणा केली होती. ती सत्यात उतरणार नाही. हि फसवी योजना आहे. कोरोना काळात संपुर्ण देश आर्थिक संकटात सापडला असताना छुप्यामार्गाने महागाईत या सरकारने वाढ केली आहे. इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने भर रस्त्यावरच चूल पेटवत निषेध आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीत केंद्र सरकार रोजच भाववाढ करीत आहे. हि भाववाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 6 फेब्रुवारी) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी नगसेविका शमीम पठाण, शिक्षण मंडळाच्या माजी उपसभापती लताताई ओव्हाळ, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्षा पल्लवी पांढरे, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगिता कोकणे, नगरसेविका सुलक्षणा धर, निकीता कदम, गिता मंचरकर, उषा काळे तसेच शहर संघटीका सुप्रिया भिंगारे, शहर उपाध्यक्षा मिना कोरडे, दिपाली देशमुख, अर्चना राऊत, माहेश्वरी परांडे, भोसरी महिला कार्याध्यक्षा संगिता आहेर, प्रभाग अध्यक्षा मंगल ढगे तसेच फैमिदा शेख, रुपाली भाडाळे, स्वप्नाली असवले, ज्योती निंबाळकर, संगिता जाधव, श्वेता हिमाणी, मनिषा जठार, सुंगधा पाषाणकर, प्रतिभा दोरकर, सिमा हिमाणे, लता पिंपळे, उषा चिंचवडे, अश्विनी पोळ, सविता धुमाळ आदी उपस्थित होते.