बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

खुशखबर! पिंपरी चिंचवडमधील वकिलांना मिळणार दहा हजार रुपयांची मदत

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवडमधील वकिलांना दहा हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड अॅडवोकेट बार असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. ही शहरातील नोंदणीकृत बाराशे वकिलासांठी खुशखबरच म्हणावी लागेल. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ॲड दिनकर बारणे यांनी वास्तव संघर्षला माहीती दिली आहे त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा दि . 05 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता संस्थेच्या ऑफीस वकील बाररुम पिंपरी न्यायालय येथे संपन्न करण्यात आली . संभेचा कोरम पुर्ण झाल्यामुळे अॅड . सुशिल मंचरकर यांना विशेष सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष स्थानी नेमण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात.

यामध्ये गरजु वकीलांच्या सहायता निधीपोटी जमा झालेली एकुण रक्कम रु .5,93,828 / – पैकी गरजु वकिलांसाठी अन्न धान्य किट पोटी खर्च झालेली रक्कम रु .18,380 / – या खर्चास मान्यता देण्यात आली . ती खर्चा रक्कम वजा जाता शिल्लक रक्कम रु . 5,75,448.50 व्याजासह तो निधी तसाच पुढे चालु ठेवुन त्यापैकी त्या खात्यामध्ये यापुढे जमा होणाऱ्या रक्कमेमधुन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनच्या मयत सभासदांच्या वारस पत्नीस किंवा पतीस मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे सभासदांस अपघात अथवा गंभीर आजार असलेल्या सभासदास जो सभासद 24 तास पेक्षा जास्त कालावधीसाठी हॉस्पीटल मध्ये अॅडमिट असेल किंवा झाले असतील त्यांना अटी व शर्तीवर परतफेडीच्या बोलीवर सहायता निधी रक्कम दहा हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंजूर निर्णयावर सुचक म्हणून अॅड . पुनम राऊत तर अनुमोदक म्हणून अॅड . अतुल अडसरे यांनी सह्या केल्या आहेत.

“या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडमधील ब-याच वकिलांना तत्काळ स्वरुपाची मदत मिळणार आहे, तसेच आतापर्यंत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनचे बाराशे सभासद असून त्यांना वेळेवर मदत करण्यासाठी बार असोसिएशन नेहमी तत्पर असेल. अडचणीत असलेल्या वकिलांना मदत करण्यासाठी कोणी येत नाही पण ही दहा हजारांची मदत वकिलांची अडचण दूर करण्यास साह्यय करेल हे नक्की

ॲड. अतिश लांडगे
सदस्य :शिस्तपालन समिती बार कोन्सिल महाराष्ट्र आणि गोवा

Share this: