बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड :कृत्रिम अवयवांसाठी अपंगांना 50,000 हजार रुपये अनुदान द्या – राजू हिरवे

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील अपंगांना शासनाच्या वतीने दळणवळण करण्यासाठी आवश्यक असणारे कृत्रिम अवयवांसाठी 50,000 हजार रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते माञ शहरातील बहुतांश अपंगांना हे अनुदान अद्याप मिळालेच नाही त्यामुळे झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे यांनी याबाबत दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व इतर आवश्यक साधन सामग्रीसाठी 50,000 हजार रुपये अनुदान मिळणे बाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि दिव्यांग सहाय्यक उपआयुक्त नागरवस्ती विभाग पिंपरी चिंचवड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे..

हिरवे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी म्हणजे 3 डिसेंबर 2019 रोजी जागतिक अपंग दिनाचा कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्फत घेऊन कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमात जाहीर केले की दिव्यांग बांधवांना ह्या पूर्वी देण्यात येणारे 10 हजार रुपये अनुदान बंद करून यापुढे हे अनुदान रुपये 50 हजार देण्यात येईल . परंतु तरीदेखील दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी याच घोषणेला एक वर्षाची पूर्ती होऊन देखील त्याची पूर्तता झालेली नाही . तरी आपण सदर योजनेचे फॉर्म वितरित करून दिव्यांगांना अर्थसहाय्य देण्यात यावे

Share this: