बातम्या

44 हजार 700 रुपयांचा माल चोरणाऱ्या रिक्षाचालकाला हिंजवडी पोलिसांनी केली पाच तासांच्या आत अटक

हिंजवडी (वास्तव संघर्ष) :रिक्षातून हेडफोन पार्सल घेऊन जाणा-या एका तरूणावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीने ते हेडफोन चोरून नेणाऱ्या रिक्षाचालकांला पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत अटक केली आहे. ही घटना आज सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शिवाजी चौक हिंजवडी ते बाणेर मार्गावर घडली होती.

याबाबत मनीष कुमार भोगी पासवान( वय 22 वर्षे राहणार मांजरी हडपसर पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

परमेश्वर गंगाधर लोंढे( वय 23 वर्ष रा.लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष हे शिवाजी चौक हिंजवडी ते बाणेर असे प्रवास करण्याकरिता शिवाजी चौक येथून भाड्याने शेअरिंग रिक्षामध्ये जाण्याकरीता बसले होते.त्यावेळी रिक्षा ड्रायव्हर व रिक्षामध्ये बसलेले इतर दोन अज्ञात व्यक्ती यांनी फिर्यादी मनिष कुमार पासवान यांना बाणेर येथे न सोडता अज्ञात स्थळी घेऊन जाऊन त्यांच्याकडील असलेले डिलिव्हरी पार्सल (४ हेडफोन) त्यांचे वापरते दोन मोबाईल, पावर बँक, चांदीची चैन, व कॅश असे एकूण 44 हजार 700 रुपयांचा माल लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीने हिसकावून घेऊन आरडाओरडा केल्यास ब्रिज वरून टाकून देऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी सी.एन.जी. पेट्रोल पंपावरील प्राप्त सी. सी. टी.व्ही. फुटेजच्या आधारे अज्ञात रीक्षा चा नंबर प्राप्त करून आरोपी परमेश्वर गंगाधर लोंढे याला अटक केली आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Share this: