बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी नवीन सात रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे . मागील पाच दिवसांमध्ये दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत . मागील चार दिवसात 10 नवे रुग्ण आढळून आले आहेत . मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे.

आज शनिवारी आज एकाचदिवशी सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे . त्यामध्ये 12 वर्षाच्या मुलासह 35 , 38 आणि 21 वय वर्ष असलेले चार पुरुष रुग्ण आहेत . तर , 10 वर्षाच्या मुलीसह 30 आणि 62 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाला आहे . एकाच दिवशी सात रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शहरात एकूण 61 कोरोनाचे रुग्ण झालेत .यापैकी 12 रूग्ण कोरोनामुक्त झालेत . उर्वरित रुग्णांवर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात तर तिघांवर पुण्यात उपचार सुरु आहेत

Share this: