बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंतीदिनी लढा यूथ मूव्हमेंट कडून अभिवादन

पिंपरी (वास्तव संघर्ष) :धर्मग्रंथ आणि अनिष्ट चालीरिती रूढी परंपरा यांची शिकवण होती की मुलींना शिक्षण देऊ नका अस्पृश्य मुलींना तर त्याचा विचार देखील करायला लावू नका. या विचारा विरुद्ध बंड करत आपल्या घरातील मुलीला राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिराव फुले यांच्या व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिक्षणासाठी पाठवणारे वीर लहुजी वस्ताद साळवे यांना आज 226 व्या जयंती निमित्त लढा यूथ मूव्हमेंट कडून अभिवादन करण्यात आले.


पुरंदरच्या मातीत जन्मलेले क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधातील लढ्याला खऱ्या अर्थाने बळ दिले. महात्मा फुले यांच्यामागे ठामपणे उभे राहून त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला अश्या थोर क्रांतिवीरास कोटी कोटी प्रणाम. असे प्रमोद क्षिरसागर यांनी आपल्या भाषणात म्हंटले.
यावेळी लढा यूथ मूव्हमेंट चे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, भैय्यासाहेब ठोकळ, समाधान कांबळे, सिद्धार्थ मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this: