पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या कोरोना साहित्य खरेदीची चौकशी करा :मुख्यमंत्र्यांना निवेदन
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महापालिकेत अखंडीतपणे भ्रष्टाचाराची मालिका उद्ध्वस्त करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी महापालिकेसमोर आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आले आहे. कोरोना विषाणू महामारीत महापालिकेने खरेदी केलेल्या वैद्यकीयसह अन्य साहित्य उपकरणात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे, या सर्व प्रकरणात भांडार विभागातील सहायक आयुक्तांसह अन्य सहायक भांडार अधिकारी आणि ठराविक ठेकेदारांची लाॅबी तयार झाली आहे. त्यामुळे कोविड खरेदीची सीबीआय चाैकशीची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांनी चाैकशी करुन दोषीवर कारवाई मागणी बहूजन सम्राट सेना आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप यांनी केली आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, डॉ,बाबासाहे आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे, रोजगार निर्माण परिषद अध्यक्ष बाबुराव मदने, भिमशाही युवा संघटना अध्यक्ष शिवशंकर ऊबाळे , माता पिता संघ अध्यक्ष दादासाहेब खनके,रिपब्लीकन विद्यार्थी सेना अध्यक्ष बाळासाहेब बरगले,मानवहित लोकशाही पक्ष अध्यक्ष राजू धुरंदरे.भिमबाना प्रतिष्ठान अध्यक्ष सिध्दार्थ सिरसाठ यांनी पाठिंबा दिला आहे
त्यांनी दिलेल्या निविदेनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोनोसारख्या महामारीच्या काळातही भांडार विभागातील अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने भ्रष्टाचार करीत आहेत, यामध्ये लॅब केमिकल, आयटीआयसाठी साहित्य खरेदी, आयसीयु युनिट, ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन, सोनोग्राफी युनिट, एमआरआयसाठी सिरिंज पंप खरेदी, एक्स रे मशीन खरेदी यासह अनेक प्रकारच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.
महापालिकेतील भांडार विभगाने गैरकारभाराची सीमारेषा पार करत आहे. कारण, प्रत्येक वस्तू ही बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात आलेल्या आहेत. त्यातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात केलेला हा भ्रष्टाचार म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी तातडीने दखल घेवून कोविड काळातील खरेदीची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच भांडार विभागातील सहायक आयुक्त, भांडार अधिकारी आणि सहायक भांडारपाल यांच्या संपत्तीची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी.
करदात्या नागरिकांचे पैसे या भ्रष्टाचाऱ्यांकडून वसूल करण्यात यावेत, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्याचबरोबर महापालिकेच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा खर्च होतो. यातील पैसा प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे खर्च झाला पाहिजे. परंतु, कामातील दिरंगाई, प्रशासकीय हलगर्जीपणा, भ्रष्टाचार यामुळे द्यावी लागणारी मुदतवाढ आणि भरमसाठ दरवाढ यामुळे ठेकेदार तसेच आधिकार्यांनी महापालिका पैसे कमविण्याची कुरण झाली आहे.
त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचा प्रकार सुरु आहे, भांडार विभागातील आधिकारी आणि ठेकेदारांची ‘लॉबी’ तयार होत असून विशिष्ट ठेकेदार नजरेसमोर ठेवायचा, त्या अनुषंगाने अटी-शर्ती तयार करायच्या आणि त्यालाच काम द्यायचे, ही साखळी असेल तर त्याची सीबीआय मार्फत चौकशी व्हायलाच हवी, अशीही मागणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे केलेली आहे.