प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये, सत्ता कशी मिळवायची हे त्यांनी माझ्याकडून शिकावे- रामदास आठवले
वास्तव संघर्ष
सोलापूर – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टिप्पणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर अाहेत त्यामुळे त्यांचा मला नितांत आदर आहे. माञ सत्ता कशी मिळवायची हे त्यांनी माझ्याकडून शिकावे असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे ते सोलापूर येथील जाहीर सभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये, वंचित आघाडीमुळे मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्यांचा फायदा शिवसेना आणि भाजप या पक्षालाच होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सर्व जातीतील नेत्यांना समावून घेतले तरी २००९ च्या माझ्या अनुभवानुसार डोक्यात हवा आणि पैसै असणारेच वंचित आघाडीत सामील होतील. त्यामुळे या आघाडीला फारशे यश मिळणार नाही असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आम्ही २०१२ च्या निवडणुकीत शिवशक्ती – भिमशक्ती चा प्रयोग करून महाराष्ट्रभरातून कार्यकर्ताचाही फिडबॅक घेतला. तेव्हा काॅग्रेसने मला काय दिले? असा प्रश्न कार्यकर्तांनी मला केला आपली वेगळी ओळख आहे असे कार्यकर्त्यांना पटवून दिल्यानंतर आपण भाजपसोबत गेलो. भाजप जातिवादी पक्ष आहे असा खोटा अपप्रचार काॅग्रेसने केला माञ भाजपमध्ये सर्व जातीधर्मातील लोक निवडून आल्याने मी भाजपसोबत गेलो. असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.