क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

निगडी (वास्तव संघर्ष) : गाडी सरळ चालव असे म्हणला म्हणून एका तरुणाच्या अंगावर गाडी घालत त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री साडेनऊ वाजता दळवीनगर ओटास्कीम निगडी येथे घडली आहे .तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अजिंक्य कैलास जाधव (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी)यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वप्नील उर्फ सोप्या उघडे (वय 19, ), अतुल उर्फ लखन पवार (वय 19), रोहन उर्फ पिन्या भोसले (वय 19 सर्व रा. गुरुदत हौ. सोसायटी दळवीनगर सेक्टर नं – 22 ओटास्किम निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शुक्रवारी रात्री फिर्यादी यांच्या अंगावर गाडी घातली. त्यावेळी फिर्यादी यांचा मित्र सूरज याने आरोपींना ओरडून ‘ ये सरळ गाडी चालव’ असे म्हटले. हे ऐकून आरोपींनी गाडी काही अंतरावर थांबवली. आरोपी स्वप्नील याने सिमेंटच्या गट्टूने फिर्यादी यांच्या तोंडावर डोक्यात मारून गंभीर जखमी केले. आरोपी अतुल आणि आरोपी रोहन यांनी ‘आम्हाला बोलतो का’ असे म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथांनी मारहाण केली. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Share this: