घरात घुसून टोळक्याने केली तरूणीला मारहाण
निगडी (वास्तव संघर्ष) : बेकायदेशीरपणे घरात घुसून सहा जणांच्या टोळक्याने महीलेला मारहाण करत घरातील वस्तूची तोडफोड केली आहे . ही घटना शनिवारी (दि. 6) दुपारी दळवीनगर, ओटास्किम निगडी येथे घडली.
एका 20 वर्षीय तरुणीने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
समाधान उर्फ सॅम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे पाच साथीदार यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या घराच्या दारावर लाकडी दांडके, कोयता आणि दगड मारले. फिर्यादी तरुणीनी दार उघडले असता आरोपींनी अनधिकृतपणे फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला.
फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करून पोटात लाथ मारली. कानाखाली चापट मारून घरातील खिडकीची काच फोडली. यावेळी फिर्यादी तरुणीने आरडाओरडा केला असता शेजारी राहणारे लोक जमा झाले. जमा झालेल्या लोकांना आरोपींनी लाकडी दांडके, कोयता, दगड आणि कमरेचा बेल्ट दाखवून ‘कोणी पुढे आले तर एकालाही जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून दहशत निर्माण केली. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत