बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

एन.एस.यु.आय.च्या वतीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) व केंद्र सरकारच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलने

पुणे (वास्तव संघर्ष) :देशा मध्ये कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असल्यामुळे अनेक राज्य सरकारने तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असताना मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्य व जिवीताचा विचार न करता विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा काही मार्गदर्शकतत्वांचे पालन करुन घेण्यात याव्यात असे परिपत्रक काढण्यात आले. मात्र भयानक सद्यस्थिती पाहता त शक्य नाही. विद्यार्थ्यांची मानसिक तयारी, राहण्यासाठी जागा,जेवणाची व्यवस्था,प्रवास अशा,काही ठिकाणी अजुनही विलगीकरण कक्ष आहेत अशा अनेक अडचणींचा सामाना करावा लागणार आहे.

त्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य एन.एस.यु.आय.च्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला असुन पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन UGC च्या परिपत्रके जाळून केंद्रीय मनुष्यबळ मंत्री डॉ रमेश पोकरियाल यांचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश अध्यक्ष अमीर शेख, प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, राष्ट्रीय प्रतिनिधी अक्षय जैन, प्रदेश सरचिटणीस संदेश टेम्भुरने, डॉ. हर्षवर्धन सावंत, केतन जाधव, राज जाधव सह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षे संदर्भात घेतलेला निर्णय अयोग्य असुन विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या आरोग्य व जिवताशी खेळल्यासारखे आहे.विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकार यांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन परीक्षा तात्काळ रद्द कराव्यात नाही तर देश पातळीवरुन व्यापक अंदोलन उभारले जाईल.यावेळी
अमिर शेख, अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.(विद्यार्थी काँग्रेस)उमेश राम खंदारे, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय.(विद्यार्थी काँग्रेस) उपस्थित होते.

Share this: