माझं पिंपरी -चिंचवड

नियमाचे उल्लंघन करून महापौरांनी एकदम मंजूर केलेले विषय रद्द करा – दत्ता साने 

वास्तव संघर्ष :-

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी एकदम मंजूर केलेले विषय रद्दबातल करून पुन्हा पुढील सभेच्या कार्यपत्रिकेवर ठेवण्यात यावेत अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्ष नेता दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गुरुवारी केली.

साने यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,  महापालिका सभेच्या कार्यपत्रिकेवरील प्रत्येक विषयांचे वाचन न करता किंवा रितसर सभापटलावर विषय न मांडता  महापौर यांनी विषय क‘. १ ते १२ मंजुर करण्यात आल्याचे जाहीर केले. सदरचे सभेतील विषय सभापटलावर न ठेवता किंवा विषय न वाचता  एकदम मंजूर करणे ही बाब  सभाशास्त्राच्या नियमांना धरून नाही. महापौरांनी नियमांचे पालन केले नाही.  त्यामुळे सदरचे विषय मंजूर जरी झाले असले तरी या विषयांची अंमलबजावणी करण्यात येऊ नये याबाबत आम्ही आपणाला पत्रान्वये कळविले होते.

त्या अनुषंगाने महापालिका सभा माहे जानेवारी २०१९ चे कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण २ महानगरपालिका,स्थायी समिती, परिवहन समिती इत्यादींचे कामकाजामधिल अनुसूची ड मधिल (ओ) व (प) अन्वये विधीवत झालेले नाही. त्यामुळे प्रकरण  ६ मधील सेक्शन ६७ अनुक्रमांक ३ अन्वये आपणांस असलेल्या अधिकाराचा वापर करुन उपरोक्त सभेमध्ये मंजूर झालेले विषय रद्दबादल ठरवून ते आगामी महापालिका सभेच्या कार्यपत्रिकेवर पुनश्च: ठेवण्याबाबत आपणांकडून कार्यवाही करण्यात यावी.

Share this: