बातम्या

अभियांत्रिकी महाविद्यालयाने सरस्वती पूजा करण्यास परवानगी नाकारली

वास्तव संघर्ष न्यूज :- केरळ येथील अलापुज्झा जिल्ह्यात कोचीन अभियांत्रिकी महाविद्यालयाने सरस्वती पूजा करण्यास परवानगी नाकारली आहे. आम्ही सर्व-धर्मीय परंपरा पाळणारे आहोत कारण आम्ही सेक्युलर आहोत त्यामुळे सरस्वती पूजा करता येणार नाही असे या महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.

या अभियांत्रिकी महाविद्यालयात सरस्वती पूजा करण्यास विरोध दर्शविला आहे तसेच त्यांनी सरस्वती पूजेला संमती देण्यात आलेली नाही. आमच्या महाविद्यालयातील कुलगुरुंनी सरस्वती पूजा करण्यास मनाई केली आहे कारण आमची संस्था सर्वधर्मीय परंपरा पाळणारी संस्था आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही धार्मिक बाबींना आम्ही महाविद्यालयाच्या आवारात संमती देऊ शकत नाही असे कुलगुरुंनी म्हटल्याचे महाविद्यालयाच्या रजिस्ट्रारने म्हटले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Share this: