बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त व आमदारांमध्ये समन्वय नाही कोरोनाच्या परस्थितीबाबत शहरातील भयावह वास्तव:छाया सोळंके-जगदाळे यांचा आरोप

पिंपरी:- कोरोना परस्थिती बाबत शहरातील तीनही आमदार व महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यात कसलाही समन्वय नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत आहे. दैनंदिन संसर्ग सुरु असलेल्या रुग्णांचा दोन आकडी संख्या आता तीन आकड्यावर आली आहे. तरी देखील याकडे जबाबदार व्यक्ति गांभिर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे. यामुळे शहरातील सामान्य नागरीक मात्र भितीच्याच नाहीतर मृत्यूच्या छत्रछायेखाली आहे. यातच लोप

लोकप्रतिनिधीचे याकडे होत असलेले दुर्लक्ष ही तितकेच जबाबदार आहे. असा आरोप मराठी एकीकरण विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष छाया सोळंके-जगदाळे यांनी केला असून, आठवडा भरासाठी शहर कडकडीत बंद ठेवावी अशीही मागणी केली आहे.पिपंरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होण्याएवजी दिवसेन दिवस वाढतच आहे. महापालिका प्रशासनाचे कर्मचारी प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरुन काम करत असताना दिसतात तसेच आयुक्त देखील कार्यरत आहेत.

पण या कामाची दिशा कुठेतरी भरकटल्यासारखी वाटत आहे. त्यामुळेच वाढत्या रुग्णांच्या संख्या कमी होताना दिसत नाही. आज शहरात तीन आमदार असताना देखील आयुक्त व या लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन या बाबतची परस्थिती हाताळताना नागरीकांना कुठे दिसले नाही. आज शहरात जवळपास सर्वच व्यवहार व दुकाने चालु आहेत. त्यामुळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. त्यामुळे सर्वच ठिकाणी फिजीकल डिस्टंन्स किंवा या कोरोना बाबतची खबरदारी घेताना हालगर्जीपणा झालेला दिसतो. जर कष्टकरी लोकांच्या टपऱ्या , चहाचे गाडे बंद केली असतील तर स्विट मार्टसाऱखे दुकाने ही बंदच ठेवली पाहिजे, तीच परस्थिती कपड्यांच्या दुकानाची देखील आहे.

अशी अनेक उदाहरणे शहरातील देता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्य शासनाने महापालिका हद्दीत पालिकेच्या आयुक्तांना शहरतील परस्थिती पाहुन लॉकडाऊन किती शिथील करायचा किंवा किती सक्त करायचा याचे अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा वपार स्थानिक आमदार यांना विश्वासात घेऊन पुन्हा एकदा काही दिवस तरी लॉकडाऊन सक्त करण्यासाठी वापरला पाहिजे. आज इतरही अनेक महानगरापालिकेने या बाबत सक्त धोरण अवलंबून निर्णय घेतला आहे. पण पिंपरी चिंचवड शहरात मात्र कमालीची कोरोना बाधितांची संख्या वाढली असताना मात्र नागरीकांना मृत्युच्या दाढेत लोटले असल्याचे दिसत आहे. याला महापालिका आयुक्त यांच्या बरोबरच येथील लोकप्रतिनिधी देखील तितकेच जबाबदार आहेत.

दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या मृत्युलाही हीच परस्थिती जबाबदार

जर आज सामान्य नागरीकाबरोबरच महानगरपालिकेचे सदस्य देखील कोरोनाचे बळी ठरत असतील तर नक्कीच याचा दोष येथील परस्थितीला व या परस्थितीवर नियत्रंण ठेवणाऱ्या घटकांना द्यावा लागेल. जर वेळीच या परस्थितीवर नियत्रंण ठेवले असते तर दत्ता साने यांच्या सारख्या लोकप्रिय लोकसेवक आज जनतेत राहिला असता. असे असूनही अदयोपही प्रशासन यंत्रणेला व तीनही आमदारांना जाग आली नसल्याचे दिसत आहे. महापालिका प्रशासन सध्या कोरोना झाल्यावर च्या परस्थितीला तोंड देण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. पन कोरोना होऊ नये या महत्वाच्या मुद्दयाकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. कोरोना होऊ नये यावर काय उपाय योजना आयुक्तांनी केल्या आहेत. हे शहराला आयुक्तांनी सांगावे.

तसेच या उपाययोजनेमुळे कोरोना बांधितांची संख्या थांबली आहे का ? यावर देखील येथील लोकप्रतिनिधी भाष्य करावे. कोरोनाचे वाढते रुग्ण हे पुर्णपणे आयुक्तांचे अपयश आहे. हे त्यांनी मान्य करावे. तेवढेच अपयश तीन्ही आमदारांचे देखील आहे. या सर्व कारणामुळे शहरातील कोरोनाची परस्थिती ही हाताबाहेर गेले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरीकांना विश्वास घेऊन काही दिवस शहर हे कडकडीत बंद ठेवावे.

Share this: