क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वारकरी भाविकांचे मंगळसूत्र, पाकिटांवर डल्ला मारणा-या चोरटय़ांना पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : कोरोना या संसर्गजन्य रोगानंतर पहिलाच पालखी सोहळा असल्याने यावर्षी पिंपरी चिंचवड शहरात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरट्यांनी वारकरी भाविकांचे मंगळसूत्र, पाकिटांवर डल्ला मारला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशाच काही गुन्हेगारांवर लक्ष ठेवून अटक केली आहे. तब्बल 60 चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून तब्बल साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. 

किशोर पुंजाराम जाधव (वय ३३, रा.पाथर्डी, अहमदनगर), ग्यानदेव बाळा गायकवाड (वय ३४, रा.जालना), नितीन अशोक जाधव (वय २५ रा. अक्कलकोट) गणेश जाधव (वय २५, रा सोलापूर) कुणाल बाळु मोरे (वय ३० रा. दिघी), दत्ता श्रीमंत जाधव (वय २४, रा. गांधीनगर झोपडपटटी), प्रशांत विजय गायकवाड (वय २५, रा.बीड), अविनाश भागवत गायकवाड (वय १९, रा. बीड), विजय सर्जेराव पवार (वय ४३, रा. अहमदनगर), आकाश मोहन डुकरे (वय २१, रा. अहमदनगर) बजरंग रघुनाथ पवार, किरण अशोक नेखवाल, विठठल अश्रुबा जाधव, संतोष वसंत गायकवाड, गणेश रामा पिटकर, माधव सखा पवार, ज्ञानेश्वर मधुकरराव जाधव, विजय महींद्रसिंग, राकेश राजू झेंडे, विजय बाळासाहेब गायकवाड, शाम गुणाजी गायकवाड, रायाविठ्ठल बडीदकर, राहुल अशोक गंगावणे, विकास भारत गायकवाड, दामोदरदत्त बबन धोत्रे, सुरज भारत पवार, शांता वसंत गायकवाड, कमल सुरेश जाधव, रेणुका राजू गायकवाड, सारिका भाउसाहेब गायकवाड, हौसाबाई नामदेव कांबळे, कोमल सुनील गायकवाड, सोनी सागर सकट, अंजू कृष्णा उपाध्ये, रंजनी प्यारेलाल कांबळे, सविता महोदव गायकवाड, पंचकुली बाबासाहेब गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहू, आळंदी परिसरात पालखी सोहळ्यासाठी आलेल्या 225 संशयित व्यक्तींना पोलिसांनी आधी ताब्यात घेऊन चौकशी केली त्यापैकी 60 जणांना गुन्हा करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं असून अटक करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर पालखी सोहळा वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडला. त्यामुळं मोठ्या प्राणावर गर्दी झाली होती. याचा फायदा चोरटे उचलत होते. अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे. 

Share this: