“नाहीतर तुझे मुंडके कापून टाकेन… रावण गॅंगची पिंपरी चिंचवडमध्ये दहशत
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये रावण गॅंगच्या म्होरक्याने एका इमारतीत घूसून तलवारीचा धाक दाखवून ही इमारत खाली करा नाहीतर तुझे मुंडके कापून टाकेन अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (दि.12 ) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गुलीस्ताननगर, कासारवाडी येथे घडली आहे.
समशेर आलम बशीर शेख (वय-49 रा. गुलीस्ताननगर , कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सर्फराजताज शेख उर्फ रावण (वय-25), शाहबाज ताज शेख , (वय-23 ),अरबाजताज शेख(वय-22 ) जोहल ताज शेख , (वय-29 ) नवाजताज शेख (वय-19 ) महिला आरोपी( वय अंदाजे-48) सर्व रा. गुलीस्ताननगर कासारवाडी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गुलीस्ताननगर, कासारवाडी येथे फिर्यादी समशेर यांच्या इमारतीमध्ये सर्व आरोपी आले व त्यांनी इमारती मधील दुस-या व तिस-या मजल्यावर जावुन रुमचे कुलुप तोडले व सदरच्या रूम मध्ये घुसुन त्यावर कब्जा केला. फिर्यादी समशेर यांनी त्यांना प्रतीकार केला. तसेच सदर इमारत ही आमचे मालकीचे आहे तुम्ही आमचे परस्पर येथे राहु शकत नाही असे सांगितले असता आरोपी सर्फराजताज उर्फ रावण याने फिर्यादी समशेर यांना तलवार दाखवुन “ तुम मुझे पेहचानते नही, इस इलाकेका मै भाई हु.. किसीको भी पुछ लो रावण कोण है और रावणकी गँग क्या है, यहां पे रहोगे तो तुम सबकी मुंडी छाट लुंगा.. ” अशी धमकी दिली.
फिर्यादी समशेर यांनी त्यांना विरोध केला असता आरोपी सर्फराजताज उर्फ रावण याने फिर्यादीच्या गळयाला तलवार लावल्याने फिर्यादी घाबरुन गप्प राहिले. त्यानंतर शुक्रवारी (दि.24) रोजी आरोपींनी पुन्हा फिर्यादीला घराजवळ अडवुन “ तुझे रुम मे रहने को वो रुम खाली कर दे वरना तेरी कोई खैर नही, हम तेरी मुंडी काट डालेंगे” अशी धमकी दिली आहे. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.