बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पर्यावरण प्रेमी महापौरांनी शहरात ठेवला आदर्श ;पत्नी समवेत महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिका व सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेनशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग २ चिखली येथील रंगनाथ नगर, सहयोग नगर, पंतनगर येथे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.सिंगल युज प्लास्टिक मुक्त मोहिम स्वच्छ भारत अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्याकरिता सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी पर्यावरण प्रेमी महापौर राहुल जाधव यांनी ही सुरवात केली.

महापौर राहूल जाधव व त्यांच्या पत्नी मंगल जाधव यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. सिंगल युज प्लास्टिक वापरल्याने वातावरणाची हानी होत आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगसारखे धोके जाणवत आहेत. मुकी जनावरे प्लास्टीकच्या पिशवीत असणारे अन्न खातात. त्यामुळे प्लास्टिक जनावरांच्या पोटात गेल्याने जीव जाण्याचा धोका असतो. दैनंदिन जीवनात घराबाहेर पडताना वस्तू, साहित्य आणण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी केल्यास सिंगल युज प्लास्टिक टाळता येईल, त्या अनुषंगाने कापडी पिशव्या वाटपाची मोहिम राबविण्यात येत आहे.

नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तू वापरणे टाळावे असे आवाहन देखील महापौर राहूल जाधव व त्यांच्या मंगल जाधव यांनी केले. यावेळी प्रताप भांबे यांनी सिंगल युज प्लास्टिकचे तोटे याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, आरोग्य निरीक्षक व्ही. केंचनगोडार, प्रभागातील साफसफाई कर्मचारी तसेच सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेनशनचे उपनियंत्रक संतोष कुमार सिंग, राजेश चौधरी, गोपाळ झा, विनोद पाठक आणि प्रभागातील संभाजी घारे, सुरेंद्र लोखंडे, प्रशांत राऊत, अमर चांगभले, शांताराम जाधव, हनुमंत जाधव, सुरज घोडके, नंदकुमार जाधव, जय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अक्षय जाधव तसेच बचत गटातील असंख्य महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.

Share this: