विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर आणि आयुक्तांचे अभिवादन
पिंपरी (वास्तव संघर्ष) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी केलेले योगदान, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी उभारलेली चळवळ आणि महिला तसेच कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले महान कार्य अजरामर असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते त्यांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आणि पिंपरी चौक, हिन्दुस्तान अॅन्टीबायोटीक्स कंपनी येथील तसेच दापोडी येथील पुतळ्यास पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
अभिवादन प्रसंगी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके,विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्य तथा माजी महापौर योगेश बहल, समीर मासुळकर, राजू बनसोडे, नगरसदस्या सुजाता पालांडे, स्वाती उर्फ माई काटे, आशा धायगुडे शेडगे, निकिता कदम, अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसदस्य अंकुश कानडी, मारूती भापकर, उत्तम हिरवे, माजी नगरसदस्या उमा खापरे, सुरेखा लांडगे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीदेखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले