पुण्यातील येरवडा जेलचे गज कापून पळालेल्या एका आरोपीस वाकड पोलीसांनी केली अटक
पुणे (वास्तव संघर्ष) पुण्यातील येरवडा कारागृहातून तात्पुरत्या इमारतीतून पाच कैद्यांनी काही दिवसांपूर्वी पलायन केले होते . बुधवारी मध्यरात्री खिडकीचे गज कापून या कैद्यांनी पळ काढला होता .
देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम कांबळे आणि सनी टायरन पिंटो असे कारागृहातून पळून गेलेल्या कुख्यात आरोपींची नावे होती त्यातील एका आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
सनी टायरल पिंटो ( वय २५ , रा . पानसरे कॉलनी , पडवळनगर , थेरगांव ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .तर बाकीच्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी सनी हा येरवडा तुरूंगात न्यायालयीन कोठडीत होता . त्यावेळी त्याने तेथील इतर चार कैद्यांच्या मदतीने येरवडा तुरूंगाच्या खिडकीचे गज तोडुन बुधवारी ( दि . १५ ) रात्री पलायन केले . याप्रकरणी त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . तसेच याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले . सनी पिंटो हा थेरगाव येथील असल्याने वाकड पोलीस त्याच्या मागावर होते . आरोपी सनी हा थेरगावच्या केजूदेवी बंधाऱ्या जवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रशांत गिलबिले यांना बातमीदारामार्फत मिळाली . त्यानुसार त्याला पाठलाग करुन मोठया शिताफीने ताब्यात घेतले . त्यास पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .