प्रेस संपादक व पञकार सेवा संघाची महाराष्ट्रात चर्चा ;कोरोना जनजागृतीसाठी लावले स्वखर्चाने पोस्टर आणि बॅनर
पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कोरोनाबद्दलच्या अनेक गैरसमजामुळे अनेक नागरीक कोरोना चाचणी करण्यास संकोच करत आहेत. तसेच स्वत:ला होणा-या लहान -सहान त्रासालाही कोरोनाचे नाव देत आहेत, त्यामुळे याचा परिणाम मानसिकतेवरही होत आहे ..कोरोणाच्या भितीमुळे मानसिकताही कमकुवत बनुन आजाराला खतपाणी घातले जात आहे..शिवाय प्रकृती सुधारण्या एवजी खालावल्याची चिन्ह आहेत..
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मुंबई शाखेच्या वतीने स्वखर्चाने कोरोना जनजागृतीचे पोस्टर आणि बॅनर मुंबईत ठिकठिकानी लावण्यात येत आहेत..कोरोना विषाणूच्या काळात जनजागृती करण्यासाठी स्वताहून एकमेव पञकार संघाने पुढाकार घेतल्याने प्रेस संपादक व पञकार सेवा या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पञकार संघाची महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संपर्क प्रमुख श्री रमेश मोपकर, सांताक्रुझ तालुका अध्यक्ष श्री संतोष येरम, संघटनेचे पदाधिकारी राकेश परब, संजय सुर्वे , प्रशांत वारंग यांनी मेहनत घेतली .