मनोरंजन जगत

वंचित बहुजन आघाडीची चित्रपट क्षेत्रात ‘एन्ट्री’

पिंपरी (वास्तव संघर्ष) लोकसभा आणि विधानसभामध्ये भारतीय वंचीत बहुजन आघाडीचा झंझावात पाहण्यास मिळाला होता. माञ वंचित बहुजन आघाडीने आता चित्रपट क्षेत्रातही ‘प्रवेश’ केला आहे. राजकीय पक्षाची चित्रपट शाखा म्हटले, की शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष डोळ्यापुढे येतात. माञ वंचीत बहुजन आघाडी यांची चिञपट संघटनेने या क्षेञात एन्ट्री मारल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत मुंबई दादर राजगृह येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यभर व जिल्हाभर युनियन काम करण्यासंदर्भात सखोल चर्चा,
तसेच वंचित बहुजन चित्रपट संघटनेची स्थापना करून मराठी चित्रपट व मालिका मधील कलाकार आणि बहुजन समाजातील कलाकारांना न्याय मिळवून देण्याचे काम करेल अशी चर्चा करण्यात आली.

या चर्चेत वंचित बहुजन माथाडी ट्ररन्सपोर्ट व जनरल कामगार युनियन उपाध्यक्ष महेश भाई सावंत, सरचिटणीस संजय मोहीते,
चिटणीस विनोद कदम, खजिनदार सुशांत जाधव, उद्योजक देवेंद्र साळवी, फिल्म इंडस्टीचे भागेश डोंगरे,वंचित चे मुंबई अध्यक्ष सुरेश शेट्टी, सदस्य सुरेश मोहीते इत्यादी उपस्थित होते. व त्याचवेळी युनियन तर्फे राजगृहावर झालेल्या हल्याचा निषेध करण्यात आला .

Share this: