थेरगाव येथील भाड्याच्या फ्लॅटवर सेक्स रॅकेट;युगांडाच्या दोन महिलांना पोलीसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील भाड्याच्या राहत्या फ्लॅटवर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या युगांडाच्या दोन महिलांना पोलीसांनी अटक केली आहे . थेरगावच्या पडवळनगर भागात एका सोसायटीमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहत असलेल्या मूळच्या युगांडाच्या नागरिक असलेल्या 25 वर्षे व 40 वर्षे वयाच्या दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .
वाकड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना अतुल देवतळे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी महिला या मुळच्या युगांडा येथील रहिवासी असून त्या थेरगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होत्या . तसेच त्यांचा भारतातील वास्तव्याचा व्हिसा संपलेला असतानाही त्या भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत होत्या . उपजीवीका चालवण्यासाठी त्यांनी राहत्या खोलीत वेश्याव्यवसाय सुरू केला . व्हॉट्सअॅपद्वारे त्या लोकांना बोलवायच्या व वेश्याव्यवसाय करून कमाई करीत असत .