गांधीनगरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरीतील गांधीनगर नागरिकांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 51व्या पुण्यतिथी स्मृतीदिनानिमित्त गांधीनगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ शिरसाठ यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मातंग आणि महार या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातील एक बाजू जरी नसली तरी ते नाणं बाजारात चालणार नाही असे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपण दोन समाज एकत्र येऊन हे नाणं खणखणीत आवाजात बाजारात चालवायला हवं. ही सुरवात आपण आज साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त करूया.
यावेळी उपस्थित चंद्रकांत बोचकुरे, सिद्धार्थ शिरसाठ, सोयल शिंदे प्रतिक सोनपारखे, आनंद शिंदे चंदु भंडारी, सुमित रिटे, आतुल रसाळ, भागवत शिंदे, आभिशेक नरसिंगे दिपक पाटोळे, विनोद सोनपारखे, अदि उपस्थिती होते.
महिलामध्ये मंडाबाई अमाप, जयश्री सोनपारखे, ज्योति शिंदे, अर्चना जोगदंड, सविता सोनपारखे, सुमन नरसिंगे, मनिषा काळे, यांनी आज एकत्रित येउन पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला.